वंचित व दुर्बल घटकांसाठी सामाज कल्याणच्या खास योजना | Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana : तळागाळातील मागास, दुर्बल व वंचित बहुजनांपर्यंत शासनाच्या खास योजना पोहोचवण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनेक लाभदायी योजना आहेत. ज्या समाजातील सर्वच घटकांना न्याय मिळेल, अशा पद्धतीने या खास योजनांची बांधणी व अंमलबजावणी केली जात आहे. तरी अशाच काही महत्त्वाच्या खास योजनांबद्दल माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.

या सामाज कल्याणच्या खास योजनांमद्धे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर ( Mini Tractor Yojana ), गटई कामगार लाभार्थींना पत्र्याचे स्टॉल व शासकीय अनुदान योजना ( Gatai Stall Yojana ), ज्येष्ठ नागरिक धोरण व तसेच तृतीयपंथीय व्यक्तिंना ओळखपत्र व प्रमाणपत्र अश्या प्रकारच्या खास योजनांचा समावेश केलेल्या आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

मागासवर्ग घटकांतील आर्थिकदृष्ट्या दारिद्र्य दूर करुन त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याकरिता त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे अशे ध्येय निश्चित करून ही योजना आकण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने अनु. जाती व नवबौद्ध घटका साठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना सुरू केली गेली आहे.

दारिद्‌यरेषेच्या खालील भूमिहीन कुटुंबातिल शेतकरी व शेतमजूरानला उदरनिर्वाहाचे अन्य कुठलेली पर्यायी साधन नसल्याने त्यांना रोजगार हमी योजनामध्ये किवा खाजगी व्यक्तीकडे बिगारी पद्धतीने व तसेच शेत मजुरी करावी लागते. परिणामी, त्यांच्या राहणीमानावर त्यानुसार परिमाण होत असतो. म्हणून त्यांचे उत्पनाचे स्त्रोत वाढावता यावे व त्यांना कायम स्वरुपी उत्पन्नचे एक साधन उपलब्ध करून देणे तितकेच आवश्यक आहे.

अनुदान :

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान योजना ( Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana ) अंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध गटातील दारिद्र्यरेषेच्या खालील भूमिहीन शेत मजूर कुटुंबांना शेतीसाठी जमीन दिली जाते. सर्व जिल्ह्यातील अनु. जाती / नव-बौद्ध समुदायातून निवडल्या गेलेल्या लाभार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून 100% अनुदान तत्वावर 4 एकर कोरडवाहू ( जिरायती ) किंवा 2 एकर बागायती (पाण्या खालची) जमीन दिली जाते. या समितीद्वारे जमीन खरेदी केली जाते आणि नंतर ती निवडलेल्या लाभार्थ्यांमध्ये वाटप केली जाते.

पात्रता :

 • यासाठी, लाभार्थी हा अनुसूचित जाती / नव-बौद्ध समुदायातिल सदस्य असावा.
 • तो दारिद्र्यरेषेच्या खालील भूमिहीन असावा.
 • अनुसूचित जाती/नव-बौद्ध गट, दारिद्र्यरेषेखालील, विधवा, पीडित/अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 1989 च्या पीडितांना प्राधान्य दिले जाते.
 • लाभार्थ्याचे कमीतकमी वय १८ आणि जास्तीत जास्त वय ६० असे असावे.
 • दारिद्र्यरेषेच्या खालील कुटुंब प्रमुखाचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असल्यास ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या कुटुंबप्रमुखाच्या पत्नीला योजनेचा लाभ दिला जाऊ जातो.

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana Form मागासवर्गीय अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतिल पात्र अर्जदाराने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना साठी अर्ज करण्यासाठी खलील लिंक वरुण फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे.

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana Form

अनु जाती व नवबौद्ध च्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर | Mini Tractor Yojana

Mini Tractor Yojana या योजनेमधून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 % अनुदान तत्वावर व त्याची काही उपसाधने जसे की कल्टिव्हेटर किंवा रोटॅवेटर व ट्रेलर यांचा लाभ दिल जातो.

अनुदान : Samaj Kalyan Mini Tractor Yojana

या वस्तुच्या खरेदीची जास्तीत जास्त मर्यादा रू. 3.50 लाख इतकी राहील. या जास्तीत जास्त मर्यादेच्या रकमेच्या 10 % रक्कम व स्वहिस्सा स्वयंसहायता बचत गट यांनी भरल्यानंतर 90% शासकीय रक्कम अनुदान तत्वावर वितरीत करण्यात येत असते.

पात्रता :

 • या Mini Tractor Yojana साठी अनुसूचित जाती व नव बौद्धांच्या स्वयंसहाय्यता बचत गटाचा सदस्य महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
 • बचत गटातील 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध समुदायाचे असावेत आणि त्यांनी त्यांच्या सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र सादर करावे.
 • मिनी ट्रॅक्टर आणि त्याच्या अॅक्सेसरीजसाठी बचत गटांसाठी अनुदान मर्यादा रु.3.50 लाखांच्या कमाल मर्यादेपर्यंत समान राहील.
 • योजनेचा एकदा लाभ घेतल्यानंतर, पुढील लाभ दिला जाऊ शकणार नाही. योजनेचा लाभ दिल्यानंतर बचत गटांना या वस्तु गहाण ठेवता किंवा विकता येत नाही. बचत गटाचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असले पाहिजे आणि ते खाते आधार कार्डशी जोडलेले असावे लागते. स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध गटातील असावेत. Samaj Kalyan Mini Tractor Yojana
 • सर्व सदस्यांकडे रेशनकार्ड, आधारकार्ड, ग्रामसेवक / सरपंच व तसेच तलाठी यांचे रहिवासी प्रमाणपत्र असावे.

अटी व शर्तींची अश्या प्रकारे पूर्तता करून पूर्ण केलेले प्रस्ताव किंवा Mini Tractor Yojana Maharashtra मध्ये अर्ज मंजूर केले जातात.

Mini Tractor Yojana साठी अर्ज करा

गटई स्टॉल योजना | Gatai Stall Yojana

महाराष्ट्र राज्यात चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जातीच्या चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी व्यक्ती  असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न याच्याशी निगडीत आहे. पादत्राणे बनवणारे आणि रस्त्याच्या बाजूला उन्हात बसून कायम आपली सेवा देत असतात. अशा व्यावसायिकांना ऊन, वारा, पाऊस या सर्वापासून संरक्षण मिळावे तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, या उद्देशाने ग्राम पंचायत, नगर पालिका, महानगर पालिका व छावणी/कॅम्प क्षेत्रात (कॅटोन्मेंट बोर्ड) 100 टक्के अनुदानावर गटई कामगार लाभार्थींना पत्र्याचे स्टॉल Gatai Stall Yojana व शासकीय अनुदान रू.500/- देण्यात येतात.

यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येतात. सदर प्राप्त अर्जांची छाननी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय त्यांच्या स्तरावर केली जाते. त्यानंतर पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ देण्यात येतो.

पात्रता :

 • या साठी अर्जदार अनुसूचित जाती मधील असावा
 • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
 • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीणभाग 40,000 व शहरीभाग 50,000 पेक्षा अधिक नसावे.
 • संबंधिताचे उत्पन्न प्रमाणपत्र संबंधित तहसिलदार यांनी निर्गमित केलेले असावे.
 • अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे.
 • अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, छावणी बोर्ड यांनी त्यास भाड्याने, कराराने, खरेदीने अगर मोफत परंतु अधिकृतरीत्या ताब्यात दिलेली असावी. किंवा ती स्वतःच्या मालकीची असावी.

ज्येष्ठ नागरिकांसाठी धोरण | Jeshth Nagrik Dhoran

समाजातील निराधार व तसेच निराधार ज्येष्ठ नागरिक त्यांना होणाऱ्या त्रासातून दिलासा मिळावा व त्यांना आनंदी जीवन जगता यावे यासाठी जनजागृती करण्यासाठी शासनाने सर्व समावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण आखलेले केले आहे. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान लक्षात घेता त्यांना त्यांचे म्हातारपण चांगल्या पद्धतीने जगता यावे, त्यांचे जीवन समाजात सुसह्य असावे, शारीरिक / मानसिक आरोग्य उत्तम राहावे, वृद्धापकाळात त्यांची आर्थिक क्षमता कायम असावी, काम करण्याचा अधिकार, शिक्षण घेण्याचा अधिकार आणि सार्वजनिक संगांमटणे मदत मिळवणे हा हेतू या धोरणाचा आहे.

60 वर्षे किंवा त्यावरील नागरिकांसाठी जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण, तक्रारींचे निवारण, मनोरंजन कक्ष, मदत कक्ष उभारणे, ज्येष्ठ नागरिकांना विविध योजनांची माहिती व लाभ देणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी रुग्णालयात राखीव खाटा ठेवणे आदी कामे समितीने हाताळली जात आहेत.

तृतीयपंथीय व्यक्तिंना ओळखपत्र व प्रमाणपत्र प्रदान | National portal for Transgender Persons

केंद्र शासनाने तृतीयपंथी यांना ओळखपत्र देन्यासाठी ( National portal for Transgender Persons ) (https://transgender.dosge.gov.in/admin) हे वेबसाइट पोर्टल सुरु केले आहे. जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तीना ओळखपत्र व तसेच प्रमाणपत्र वितरीत करण्या बाबत केंद्र शासनाने आदेश काढले आहेत.

समाजकल्याण विभागाच्या मदतीने पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी केलेल्या तृतीय पंथीना ओळखपत्रे आणि प्रमाणपत्रे दिली जातात. जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे हा यामागचा नेमका उद्देश आहे.

अधिक माहितीसाठी जवळील जिल्हा आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

तर वरील सर्वच वंचित व दुर्बल घटकांसाठी सामाज कल्याणच्या खास योजना आपल्या नातेवाईक व मित्राना शेयर करायला विसरू नका.

A Local SEO Expert and an Experienced blogger from Pune.