Dudhal Gai Mhashi Vatap Yojana दुधाळ गाई म्हशीचे वाटप सुरू

Dudhal Gai Mhashi Vatap Yojana: राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत त्यांना शाश्वत अर्थार्जनाच्या पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रम जाहीर केलेले आहेत.

शेतकऱ्यांसाठी दोन दुधाळ गाई/ म्हशी वाटप योजना शासनाकडून राबवली जाते.

या योजनेमध्ये लाभार्थ्यांना 75 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. 

या योजनेविषयीची pashu vatap yojana online application प्रोसेस बद्दल संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये घेणार आहोत. 

दोन दुधाळ गाई/ म्हशी वाटप योजना | Dudhal Gai Mhashi Yojana

या योजनेमध्ये लाभार्थ्यांना दोन गाई किंवा दोन म्हशी विकत घेण्यासाठी 75 % पर्यंतचे या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते.

Dudhal Gai Mhashi Yojana या योजनेमध्ये, अर्ज करणे अगदी सोपे आहे.

लाभार्थी मित्र ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात तसेच त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये चकरा घालाव्या लागणार नाहीत. 

या योजनेसाठीची पात्रता Dudhal Gai Mhashi Vatap Yojana Eligibility

 • दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
 • अत्य अल्प भू धारक शेतकरी (1 हेक्टर पर्यंतचे भू-धारक)
 • अल्प भू-धारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्यंतचे भू-धारक)
 • सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंदणी आवश्यक)
 • महिला बचत गट समूह

टीप : लाभार्थी निवडताना 30% महिलांना प्राधान्य देण्यात येईल.

सदरील योजना ही या चालू आर्थिक वर्षात मुंबई शहर, मुंबई उपनगर तसेच दुग्धोत्पादन मध्ये स्वयंपूर्ण असलेले पुणे जिल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर व अहमदनगर जिल्हा या जिल्ह्यांच्या अंतर्गत राबवली जाणार नाही. 

हेही वाचा : Kanda Anudan 2023 याच शेतकऱ्यांना करता येणार अर्ज

गाई म्हशी वाटप योजना 2023 शासकीय अनुदान किती रक्कम मिळते?

एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे

 • संकरित गाई / म्हशी चा गट – प्रति गाय / म्हैस रु. ४०,०००/- प्रमाणे ८०,००० रुपये
 • शुल्क ५.७५ टक्के (अधिक १०.०३ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा ५,०६१ रुपये

एकूण प्रकल्प किंमत : ८५०६१ रुपये.

Dudhal Gai Mhashi Vatap Yojana
Dudhal Gai Mhashi Vatap Yojana

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे.

अ.क्र.प्रवर्ग२ जनावरांचा गट
शासकीय अनुदान अनुसूचीत जातीसाठी ७५ %६३,७९६ रु.
स्वहिस्सा अनुसूचीत जातीसाठी २५ %२१२६५. ३३ रु
शासकीय अनुदान सर्वसाधारणसाठी ५० % ४२,५३१ रु.
स्वहिस्सा सर्वसाधारणसाठी ५० %४२,५३१ रु.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे | mahabms required Documents

 • फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
 • सातबारा उतारा (अनिवार्य)
 • आठ अ चा उतारा (अनिवार्य)
 • अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वयंघोषणापत्र
 • आधार कार्ड (अनिवार्य)
 • सातबारा मधील लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र (असल्यास अनिवार्य)
 • रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
 • अनुसूचित जाती किंवा जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
 • बँक खाते पासबुक सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
 • दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
 • वय जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
 • शैक्षणिक पात्रतेचा पुरावा
 • रोजगार व स्वयंरोजगार नोंदणी आवश्यक

गाई म्हशी वाटप योजना 2023 अर्ज कसा व कुठे करावा?

 • गाई म्हशी वाटप योजना 2023 योजनेंतर्गत अर्ज करण्याची https://mahabms.com हे संकेतस्थळ आणि AH-MAHABMS हे मोबाइल अँप उपलब्ध करण्यात आलेले आहे.
 • अर्ज करण्याकरीता AH-MAHABMS हे मोबाइल अॅप्स गूगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करून घ्यावे.
 • या अगोदर डाऊनलोड केलेले असेल तर ते डिलीट करून गूगल प्ले स्टोअरवरुन पुन्हा नविन ऍप्लिकेशन अपडेट करून घ्यावे लागणार आहे.
 • अर्जदारांनी अर्ज करते वेळी त्यांची सर्व वैयक्तिक माहिती अचूक भरणे आवश्यक आहे.
 • तसेच उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व रकान्यांमधील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडण्याची जवाबदारी सर्वस्वी अर्जदाराची असेल.
 • एकदा संगणकीय प्रणालीमध्ये अर्ज सबमिट केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव मूळ अर्जामध्ये बदल करता येणार नाही याची दखल अर्जदाराने घ्यावी.

नाविन्यपूर्ण योजना 2023 लाभ कोण घेऊ शकते?

महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना हि योजना लागू नाहीत.

केवळ ग्रामीण भागातील शेतकरी राहिवाश्यांना Dudhal Gai Mhashi Vatap Yojana 2023 या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

हेही वाचा : मुलींसाठी 98,000 रु.ची लेक लाडकी योजना

Gai Mhashi Vatap Yojana 2023 योजनेची प्रक्रिया काय आहे?

 • अर्जदार नोंदणी प्रक्रियेनंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी काही दिवसांची स्वतंत्र विंडो वेबसाइट वर देण्यात येईल.
 • योजनेअंतर्गत स्वत: अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना योजनेनुसार वेळोवेळी Text SMS प्राप्त होत राहतील त्यावर अचूक लक्ष्य असावे. जेणेकरून योजनेच्या तारखेत हुकचुक होणार नाही तसेच वेबसाइट वेळोवेळी चेक करत राहावी त्यावर सूचनाही प्राप्त होत राहतील.
 • योजने अंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर बंधपत्र लाभार्थीने देणे बंधनकारक राहील.

आम्ही या योजनेसंबंधित संपूर्ण माहिती देण्याचा संपूर्ण प्रयत्न या लेखात केलेला आहे. आणखी तुम्हाला काही शंका असतील, तर तुम्ही खालील टोलफ्री क्रमांकावर संपर्क करून सर्व शंका मिटवू शकता.

कार्यालयीन संपर्क / टोल-फ्री नंबर

संगणक प्रणाली संदर्भात अडचण असल्यास खालील माहितीवर संपर्क साधावा

नाविन्यपूर्ण योजना अधिकृत वेबसाइट

नाविन्यपूर्ण योजना वेबसाईट – https://mahabms.com/

गाई किंवा म्हशीचे वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी निवड पद्धत

 • अर्जदाराला सर्वप्रथम महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या पोर्टल वर नोंदणी करून घ्यावी लागेल.
 • यानंतर दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप या योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
 • मिळालेल्या अर्जामधून प्राथमिक निवड केली जाईल.
 • निवड झालेल्या अर्जदाराची कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले जाईल.
 • यानंतर अंतिम निवड केली जाईल.

Pashu Vatap Yojana Online Application कुठे व कसा करायाचा ?

दुधाळ गाई म्हशी वाटप अनुदान योजनेसाठी ऑनलाइन अर्ज महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या पोर्टल वर म्हणजेच mahabms.com वर स्वीकारले जातात.

गाई म्हशी वाटप योजनेची कार्यपद्धती खालील पद्धतीने राहील :

 • ऑनलाईन अर्ज स्वीकारणे
 • डेटा बॅकअप करणे
 • रॅडमायझेशन पध्दतीने लाभार्थी प्राथमिक निवड करणे
 • मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे
 • पशुधन विकास अधिकारी (वि), जिल्हा | पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे मार्फत कागदपत्रे पडताळणी करुन निवड पुर्ण करणे
 • लाभार्थी मार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता करणे
 • कागदपत्रे अंतिम पडताळणी करणे
 • अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार करणे.

अशा प्रकारची योजना ही जी की शेतकऱ्यांसाठी अनुदान देणारी योजना आहे Dudhal Gai Mhashi Yojana चे अनुदान तत्वावर वाटप केले जाते. अनेक शेतकरी मित्र या योजनेचा फायदा घेतात, तुम्ही सुद्धा अश्याच योजनाच फायदा घेऊ इच्छित असाल तर मराठी आयकॉन वेबसाइट ल भेट देत रहा. अशीच माहिती तुमच्या पर्यन्त पोहचत राहू धन्यवाद..!

A Local SEO Expert and an Experienced blogger from Pune.