गरीब कुटुंबातील मुलींसाठी 98,000 रु.ची लेक लाडकी योजना | Lek Ladki Yojana Maharashtra

Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजना सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात मुलीसाठी खूप छान असे पाऊल उचलले आहे जेणेकरून मुलीला आर्थिक उच्चस्तर गाठता येईल व पुढील शिक्षण घेण्यासाठी खूप मोठी मदत होईल. मुलीच्या आई-वडिलांकडून ही या योजनेचे मनापासून स्वागत आहे.

आपण लेक लाडकी योजना काय आहे ? Lek Ladki Yojana अर्ज प्रक्रिया? लागणारी आवश्यक कागदपत्रं कोणती असतील? आणि इतर सर्व माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. Lek Ladki Yojana Maharashtra

लेक लाडकी योजना २०२३ सविस्तर माहिती | Lek Ladki Yojana Maharashtra

नुकतेच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प महा बजेट (Maharashtra Budget) 2023 सादर झाले आहे. या महा बजेट मध्ये मुलीच्या शिक्षणाला अधिक चालना देण्यासाठी ही योजना आणली असून तसेच ती काटेकोरपणे राबवण्यात यावी यासाठीही योजना आखण्यात आली आहे.

या योजनेल “लेक लाडकी योजना” असे नाव देण्यात आले आहे. या योजने मध्ये मुलीला वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत सरकारकडून मदत होणार आहे, तर सविस्तर माहिती खालील पद्धतीने आहे. Lek Ladki Yojana Maharashtra

योजनेचे नावलेक लाडकी योजना
राबवणारे राज्यमहाराष्ट्र राज्य
लाभार्थी राज्यातील गरीब कुटुंबातील मुली
स्वरूपजन्मापासून ते शिक्षण व मुलीच्या १८ वर्ष वयापर्यंत आर्थिक पद्धतीने मदत
एकूण रक्कम75,000 रुपये.
अर्ज पद्धत ऑनलाईन किंवा ऑफलाईन
Lek Ladki Yojana Maharashtra

Lek ladki yojana marathi योजनेच्या अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत

Lek ladki yojana marathi माध्यमातून मुलींना सशक्तीकरणासाठी मुलीच्या जन्मापासून ते तिच्या वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत महाराष्ट्र शासनाकडून खालीलप्रमाणे आर्थिक मदत करण्यात येते.

 • 1)‌‌ कुटुंबात मुलगी जन्मल्यानंतर पात्र कुटुंबाला 5,000 रु. ची मदत आर्थिक सहाय्य म्हणून देण्यात येईल.
 • 2) मुलीचे वय 6 वर्षे झाल्यानंतर इयत्ता पहिलीमध्ये (वर्ग ०१) शिक्षणासाठी जायला लागल्यास शासनाकडून 5,000 रु. आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
 • 3) यानंतर मुलगी इ. 6 वी मध्ये शिक्षण घेत असल्यास 6,000 रु. शासनाकडून देण्यात येतील.
 • 4) जेव्हा मुलगी इ. 11 वी मध्ये शिक्षण घेत असेल, तेव्हा शासनाकडून 8,000 रु. देण्यात येतील.
 • 5) मुलीच्या 18 वर्षे संपूर्ण झाल्यानंतर शासनाकडून तिच्या शिक्षणासाठी 75,000 रु. मदत देण्यात येतील.
 • या योजने अंतर्गत राज्यातील पात्र मुलींना 75,000 रु. पर्यंत शिक्षणासाठी आर्थिक (Economic) मदत ही केली जाईल. मुलींना सशक्त, प्रबळ व आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने ही योजना राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे.

लेक लाडकी योजनेची पात्रता | Lek Ladki Yojana Eligibility

 • लाभार्थी मुलगी ही महाराष्ट्र राज्यातीलच रहिवाशी असावी.
 • कुटुंबातील रेशनकार्ड पिवळ्या किंवा केशरी रंगाचा असावे तरच या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी पात्र ठरेल.
 • या योजनेचा लाभ वंचित व दुर्बल घटकातील मुलींना घेत येईल.
 • 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सर्व शैक्षणिक कागदपत्रं असणे अनिवार्य असतील तरच पुढील शिक्षणासाठी शासनाकडुन 75 हजार रु. मिळतिल.

लेक लाडकी योजना कागदपत्रे | Lek Ladki Yojana Form

 • मुलीचे आधारकार्ड
 • मुलीचा जन्माचा पुरावा
 • महाराष्ट्राचे रहिवाशी प्रमाणपत्र
 • शैक्षणिक कागदपत्रं
 • कौटुंबिक रेशनकार्ड (पिवळा किंवा केशरी)
 • उत्पन्नाचा दाखला
 • बँक खाते पासबुक
 • मोबाईल नंबर, ईमेल आयडी
 • फोटो

अर्ज लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा | Lek ladki yojana online form

महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची माहिती दिली; परंतु अजून या योजनेबद्दल Lek Ladki Yojana online Form भरण्यासाठी कुठल्याही प्रकारचे अपडेट व अधिकृत पोर्टल सुरू करण्यात आलेले नाही. तरी या संदर्भात आमच्या वेबसाईटवरती याची माहिती तुम्हाला देण्यात येईल. (lek ladki yojana 2023 online apply maharashtra)

लेक लाडकी योजना नव्या स्वरूपात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.

Lek Ladki Yojana Maharashtra
Lek Ladki Yojana Maharashtra

लाडकी लेक मी संताची, मजवर कृपा बहुतांची

Lek Ladki Yojana Maharashtra

मित्रांनो मुलींच्या सक्षमीकरणासाठी Lek Ladki Yojana आता नव्या स्वरूपात सुरू झाली आहे. जेव्हा तुमची मुलगी 18 वर्षाची पूर्ण होईल त्यानंतर या योजनेमधून त्यांना 75 हजार रुपये फ्री मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहेत.

त्यासाठी तुमच्या कुटुंबातील तुमचे बंधू असतील तुमची बहीण असेल यांना जर मुलगी असेल किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यांना मुलगी असेल तर ही माहिती तिथपर्यंत नक्कीच पोहोचायला विसरु नका मित्रानो या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय निघेल त्यानंतर Lek ladki yojana online form Online Registration कसे करायचे त्याबद्दलची माहिती व Website Link अजून उपलब्ध करण्यात आलेली नाही.

तरी जेव्हा केव्हाही या योजने साठीचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन चालू होतील. आणि तसेच lek ladaki yojana gr उपलब्ध होईल तुम्हाला याच वेबसाइट वरून कळवले जाईल.

महाराष्ट्र लेक लाडकी योजना काय आहे?

मुलींच्या सक्षमीकरणासाठी Lek Ladki Yojana आता नव्या स्वरूपात सुरू झाली आहे. जन्मापासून लग्नपर्यंतचा सर्व खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार आहे.

लेक लाडकी योजनासाठी पात्रता काय आहे?

लाभार्थी मुलगी ही महाराष्ट्र राज्यातीलच रहिवाशी असावी.
कुटुंबातील रेशनकार्ड पिवळ्या किंवा केशरी रंगाचा असावे.
फक्त वंचित आणि दुर्बल घटकातील मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येणार.

लेक लाडकी योजनासाठी अर्ज कधी व कसा करावा?

अजून या योजनेबद्दल अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे अपडेट व अधिकृत पोर्टल सुरू करण्यात आलेले नाही

लेक लाडकी योजनेचा काय लाभ आहे?

मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रु. इ. पाहिलीत 4 हजार रु. इ. सहावीत सह हजार रु. अकरावीत 8 हजार रु. तर मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रु. रोख मिळणार आहेत.

लेक लाडकी योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

या नवीन योजनेचा लाभ त्या कुटुंबातील मुलींना मिळणार आहे ज्यांचे पिवळे किंवा केशरी कार्ड असेल. मुलगी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

लेक लाडकी योजनेंतर्गत मुलींना किती आर्थिक मदत मिळणार आहे?

लेक लाडकी योजनेअंतर्गत, महाराष्ट्र सरकार राज्यातील पात्र मुलींसाठी 98,000/- रु. ची आर्थिक सहाय्य देणार आहे.

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक खाते, महाराष्ट्राचा रहिवासी दाखला, पालकाचा उत्पन्नाचा दाखला, फोटो, मुलीचा जन्म दाखला किंवा प्रसूतीची पावती.

A Local SEO Expert and an Experienced blogger from Pune.