Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आजपासून सुरु

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाणे ५० पेक्षा जास्त आहे. महिलांच्या आर्थिक, आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश :-

(१) राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.

(२) त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.

(३) राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.

४) राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे. (

५) महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा

Mazi Ladki Bahin Yojana योजनेचे स्वरुप

पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात दरमहा रु.१,५००/- इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे रु.१,५००/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चे लाभार्थी | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना साठी महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६० या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला यांचा समावेश लाभार्थी मध्ये आहे.

योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana eligibility

 • (१) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • (२) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
 • (३) किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत.
 • (४) सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
 • (५) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

Ladki Bahin Yojana अपात्रता

 • (१) ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
 • (२) ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
 • (३ ) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
 • (४) सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु.१,५०० /- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
 • (५) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
 • (६) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
 • (७) ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
 • (८) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. सदर योजनेच्या “पात्रता” व “अपात्रता” निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.

लाडकी बहीण योजना कागदपत्रे | Ladki Bahin Yojana documents

लाडकी बहीण योजना कागदपत्रे मध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत:-

(१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.

(२) लाभार्थ्याचे आधार कार्ड.

(३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.

(४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य).

(५) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.

(६) पासपोर्ट आकाराचा फोटो.

(७) रेशनकार्ड.

(८) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

७. लाभार्थी निवड :- “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करुन ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा.

Ladki Bahin Yojana योजनेची कार्यपध्दती :-

अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपद्वारे/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे:-

लाडकी बहीण योजना अर्ज करण्याची प्रक्रिया

 • (१) पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
 • (२) ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी “अर्ज” भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.
 • (३) वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रति केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल.
 • (४) अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
 • अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.
  • कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड)
  • स्वतःचे आधार कार्ड
अ.क्र.उपक्रमशेवटची तारीख
1अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात1 जुलै, 2024
2अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक15 जुलै, 2024
3तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक16 जुलै, 2024
4तात्पुरत्या यादीवरील तक्रार/हरकती प्राप्त करण्याचा
कालावधी
16 जुलै, 2024 ते
20 जुलै, 2024
5तक्रार/हरकतींचे हनराकरण करण्याचा कालावधी21 जुलै, 2024 ते
30 जुलै, 2024
6अंतिम यादी प्रकाशन दिनांक01 ऑगस्ट, 2024
7लाभार्थ्याचे बॅके मध्ये E-KYC करणे.10 ऑगस्ट, 2024
8लाभार्थी निधी हस्तांतरण14 ऑगस्ट, 2024
9त्यानंतरच्या महहन्यांत देय हदनांकप्रत्येक महिनाच्या 15
तारखेपयंत

Ladki Bahin Yojana लाभाच्या रक्कमेचे वितरण प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल.

A Local SEO Expert and an Experienced blogger from Pune.