Sanjay Gandhi Niradhar Yojana | संजय गांधी निराधार योजना

Sanjay Gandhi Niradhar Yojana ही एक अशी योजना आहे जी समाजातील असुरक्षित आणि उपेक्षित घटकांतील व्यक्तींना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारच्या सामाज कल्याण विभागाने सुरू केलेली एक योजना आहे.

यामध्ये आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबांना आधार देण्याच्या उद्देशाने या योजनेचे नाव भारताचे माजी पंतप्रधान संजय गांधी यांच्या नावावरून “संजय गांधी निराधार अनुदान योजना” असे ठेवण्यात आले आहे.

ही योजना विशेषता महाराष्ट्रातील निराधार दुर्बल व्यक्ती आणि कुटुंबांना त्यांची सामाजिक व आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी आणि स्वावलंबनाला चालना देण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यावर विशेष भर देते.

Sanjay Gandhi Niradhar Yojana Official Website

मित्रांनो संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana) या योजनेअंतर्गत एक हजार रुपये पेन्शन दिली जाते. 2019-20 च्या अगोदर या योजनेअंतर्गत 600 रुपये पेन्शन देण्यात येत असे पण 2019-20 मध्ये जो अर्थसंकल्प सादर झाला त्या अर्थसंकल्पानुसार जर पाहिलं तर एक हजार रुपयाची पेन्शन ही खात्यामध्ये जमा होत आहे.

तर या योजनेचा लाभ तुम्हाला त्यासाठी पात्रता काय आहे? त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात? नक्की यामध्ये काय फायदे आहेत हे आपण इथे जाणून घेणार आहोत तसेच या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज नक्की कसा करायचा किंवा ऑफलाईन अर्ज तुम्ही कसा करायचा हे दोन्ही प्रोसेस इथे आपण जाणून घेणार आहोत.

Sanjay Gandhi Niradhar Yojana या योजनेचे लाभार्थी किंवा पात्रता जर तुम्ही पाहिली तर या योजनेअंतर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला असतील, अनाथ मुले असतील, अपंग असतील सर्व व्यक्तीसाठी ही सुविधा असणार आहे.

क्षयरोग कर्करोग एड्स कृष्ठरोग यांसारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालू न शकणारे पुरुष किंवा महिला हे दोन्ही पण याच्यामध्ये पात्र असणार आहेत.

निराधार विधवा महिला असतील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या विधवांसुद्धा ह्याच्या मध्ये सामील आहेत. घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतू पोटगी न मिळवू शकणाऱ्या महिला सुद्धा यामध्ये सामील आहेत तरीही अशी महत्त्वाची 65 वर्षाखालील अट आहे ज्यामध्ये हे निराधार सर्व पुरुष व महिला यामध्ये पात्र आहेत.

हेही वाचा : लेक लाडकी योजना

त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही पाहिलं तर अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथीय, देवदासी, 35 वर्षावरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या पत्नी या सर्वांना या योजनेअंतर्गत लाभ मिळतो.

या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीमध्ये नाव असणे गरजेचे आहे आणि जर नाव नसेल तर तुम्हाला कौटुंबिक वार्षिक उत्पन्न एकवीस हजार रुपयाचे प्रमाण पत्र तहसिलदाराकडून तुम्हाला घेणे गरजेचे आहे

संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana) या योजनेखाली पात्र होणाऱ्या कुटुंबात एक लाभार्थी असल्यास एका कुटुंबात प्रत्येक महिन्याला 1000 रुपये चे अर्थ सहाय्य मिळेल आणि जर एका पेक्षा जास्त लाभार्थी असतील तर 1200 रुपये पर्यंत प्रत्येक महिन्याला आर्थिक सहाय्य दिले जाणार आहेत.

Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra Online Form Apply
Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra Online Form Apply

ऑफलाईन प्रक्रिया : sanjay gandhi niradhar yojana form pdf

संजय गांधी निराधार योजना ऑफलाईनअर्ज कसा भरायचा?

तर मित्रांनो या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी हा अर्जाचा नमुना मी खाली दिलेला आहे. या योजनेसाठी अर्ज करायचं असेल तर ऑनलाइन आणि ऑफलाईन अर्ज तुम्ही करू शकता.

तुमच्याकडे ऑनलाईन फॅसिलिटी जर नसेल किंवा काही तांत्रिक अडचणी असतील तर तुम्ही खाली दिलेल अर्ज sanjay gandhi niradhar yojana form pdf डाउनलोड करायचा आहे.

हा अर्ज तुम्हाला अर्जदाराचे नावे पत्ता, जन्मतारीख, रहिवाशी प्रमाणपत्र सोबत भरायचा आहे. यामध्ये किती वर्षापासून महाराष्ट्र मध्ये राहता कुटुंबातील व्यक्तींची संख्या जातीचा प्रवर्ग अशी भरपूर माहिती आहे ती लिहायची आहे आणि निराधारांचा तुमचा प्रवर्ग? अपंग आहे का? आजार कोणता आहे का? महिलांच्या प्रवर्गामध्ये मोडता काय ? अनाथ मुले असतील ती संपूर्ण माहिती भरायची आहे.

अर्जदाराची सही किंवा डाव्या हाताचा अंगठा इथे द्यायचा आहे आणि सही करून हे अर्ज आहेत तुम्हाला तुमच्या तहसील ऑफिस मध्ये जमा करायचा आहे.

हा अर्ज जो आहे तो संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना या अंतर्गत आहे ज्यामध्ये तुम्हाला दुसरा नमुना सुद्धा दिला आहे.

नंतर हयात प्रमाणपत्र लाईव्ह सर्टिफिकेट हे प्रत्येकाला इथे द्यायचा आहे. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र आहे तुम्ही तहसिलदाराकडून घेऊ शकता. आता आपण पाहूयात ऑनलाइन प्रक्रिया.

ऑनलाइन प्रक्रिया :

Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra Online Form Apply कसे करावे ?

मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपले सरकार डॉट महाऑनलाईन डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे

तुम्हाला एक ऑप्शन दिसेल नवीन युजर येथे नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला नोंदणी करायची नोंदणी करताना ज्या व्यक्तीला या मध्ये लाभ घ्यायचा आहे त्याच व्यक्तीची माहिती भरून रजिस्ट्रेशन करायचं आहे.

मोबाईल नंबर टाकायचा ओटीपी घ्यायचा युजरनेम तयार करायचं नाव टाकायचं ही सगळी माहिती टाकून नोंदणी करून घ्यायची आहे.

लॉग इन करण्यासाठी होम पेज वरती जिथे तुम्हाला तुम्ही जे युजरनेम आणि पासवर्ड बनवला असेल त्याच्यासोबत इथे लॉगिन करायचे आहे.

जो व्यक्ती याच्यामध्ये लाभ घेणार आहे त्याचं अकाउंट उघडून लोगिन करायचा आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा जिल्हा निवडा आणि त्याच्यानंतर लोगिन बटनावर क्लिक करा

तुम्हाला खाली सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिसेल त्यावर क्लिक करायचं.

एवढं केल्यानंतर तुम्हाला विशेष सहाय्य योजना करून नंतर पुढच्या पेज वरती घेतला जाईल नंतर कोणती आवश्यक कागदपत्रे असतात हे तुम्हाला दिसेल.

कुटुंबातील सदस्यांची संख्या व त्यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न भरायचे आहे लक्षात ठेवा 21 हजाराच्या आत मधले असणे गरजेचे आहे आणि महाराष्ट्रात रहिवाशी कमीतकमी 15 वर्षापासूनअसावा.

जात प्रवर्ग सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर विकलांग असल्यास तिथं टक्केवारी टाकायचे आहे. विकलांगा चा प्रकार निवडावा. बँकेचा तपशील मध्ये तुम्हाला सगळी माहिती भरावयाची आहे.

नंतर तुम्हाला Sanjay Gandhi Niradhar Yojana Documents अपलोड करायचे आहेत आणि अर्ज सबमिट करायचा आहे व नंतर पेमेंट करायचं आहे.

30 दिवस मंजुरीसाठी लागणार आहे तहसील कार्यालयामध्ये तर तुमचा इतर काही अडचण असेल तर तुम्ही महा ई -सेवा केंद्र किंवा तुमच्या जवळ आपले सरकार सेवा केंद्र, सेतू सेवा केंद्र यांच्या मध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता.

आणि जर तुम्हाला इथे ऑनलाईन काही अडचण येत असेल तर तुम्ही डायरेक्टली तुमचा ऑफलाईन अर्ज घेऊन तहसील ऑफिस मध्ये जाऊ शकतात 30 दिवसांमध्ये अर्ज मंजूर नाही झाला तर तुमचे कागदपत्र घेऊन तुम्हाला मंजूर करण्यासाठी तहसीलदार ऑफिस मध्ये जाऊन हा अर्ज मंजूर करून घ्यायचा आहे.

संजय गांधी निराधार योजना | Sanjay Gandhi Niradhar Yojana in Marathi

अ क्रयोजनासविस्तरपणे माहिती
1नाव“संजय गांधी निराधार अनुदान योजना : Sanjay Gandhi Niradhar Yojana”
2प्रकारराज्य सरकार पुरस्कृत योजना
3उददेशराज्यातील पात्र निराधार व्यक्तीला दरमहा आर्थिक स्वरूपी निवृत्तीवेतन
4प्रवर्गासाठी लागूसर्व प्रवर्गातील व्यक्तींसाठी ही योजना लागू आहे.
5 प्रमुख अटीsanjay gandhi niradhar या योजनेतंर्गत 65 वर्षाखालील आधार नसलेलल्या पुरुष आणि महिला, अनाथ मुले, सर्व अपंग, क्षयरोगग्रस्त, कर्करोगग्रस्त, एड्सग्रस्त, कुष्ठरोगग्रस्त असलेले व वायक्तिक चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष किंवा महिला, निराधार विधवा महिला (शेतक-यांच्या आत्महत्याग्रस्त विधवासह ), घटस्फोटीत व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिसवू शकलेल्या, अत्याचारित, पीडित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी, 35 वर्षाच्या वरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत बसलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेल रोगाने ग्रस्त या सर्वांना या योजनेचा लाभ मिळतो. संजय गांधी निराधार योजनेसाठी दारीद्रय रेषेच्या यादीत नाव असणे व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 21,000/- पर्यंत असणे बंधनकारक आहे.
6लाभाचे स्वरुपया योजनेखाली पात्र होणा-या कुटूंबात एक लाभार्थी असल्यास रुपये 1000/- प्रतिमहा तर एका कुटूंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास, रुपये 1200/- प्रतिमहा इतके आर्थिक सहाय्य दिले जाते.
7अर्जाची पध्दतअर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो
8वर्गवारीआर्थिक सहाय्य किंवा निवृत्तीवेतन
9संपर्क कार्यालयजिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय
Sanjay Gandhi Niradhar Yojana in Marathi

आवश्यक कागदपत्रे | Sanjay Gandhi Niradhar Yojana Documents

संजय गांधी निराधार योजनेसाठी खालील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे आहेत (Sanjay Gandhi Niradhar Yojana Documents) :

 • अर्जदाराचे आधार कार्ड
 • महाराष्ट्राचा रहिवासी दाखला
 • राशन कार्ड (बीपीएल)
 • मतदान कार्ड
 • वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले वयाचे प्रमाणपत्र.
 • शाळेचा दाखला.
 • उपविभागीय अधिकारी किंवा तलाठ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला.
 • जातीचा दाखला
 • अपंगाचे प्रमाणपत्र
 • असमर्थेतेचा रोगाचा दाखला
 • अनाथ असल्यास दाखला

पात्रता अटी | Sanjay Gandhi Niradhar Yojana Eligibility

संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र थरणीसाठी खालील प्रमाणे पात्रता अटी आहेत (Sanjay Gandhi Niradhar Yojana Eligibility criteria) :

 • 15 वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा
 • 18 ते 65 वयोगटातील आधार नसलेले पुरुष व महिला
 • अनाथ मुले,
 • सर्व अपंग
 • क्षयरोगग्रस्त
 • कर्करोगग्रस्त
 • एड्सग्रस्त
 • कुष्ठरोगग्रस्त असलेले व वायक्तिक चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष किंवा महिला
 • निराधार विधवा महिला (शेतक-यांच्या आत्महत्याग्रस्त विधवासह )
 • घटस्फोटीत व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळवू शकलेल्या
 • अत्याचारित
 • वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला
 • तृतीयपंथी
 • देवदासी
 • 35 वर्षाच्या वरील अविवाहीत स्त्री
 • तुरूंगात शिक्षा भोगत बसलेल्या कैद्यांची पत्नी
 • सिकलसेल रोगाने ग्रस्त
 • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 21,000/- पर्यंत असावे
 • दारीद्रय रेषेच्या खालील कुटुंबाच्या यादीत नाव असावे
 • उत्पन्नाचे कोणतेही साधन नसावे
 • जमिनीचा मालक नसावा
 • भिकारी असू नये.

या सर्वांना या योजनेचा लाभ मिळतो. संजय गांधी निराधार योजनेमध्ये दारीद्रय रेषेच्या खालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 21,000/- पर्यंतचे असणे बंधनकारक आहे.

Sanjay Gandhi Niradhar Yojana Form GR

संजय गांधी निराधार योजना | Sanjay Gandhi Niradhar Yojana Beneficiary Status

sanjay gandhi niradhar yojana beneficiary status बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाइट ल भेट द्यावी लागेल.

वेळोवेळी तेथे संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र लाभार्थी यादी अपडेट केली जाते, त्या यादीमध्ये आपले नाव तपासून बघू शकता.

Sanjay Gandhi Niradhar Yojana Helpline Number

 • Toll-Free Number: 022-26556799,
 • Toll-Free Number: 022-26514742, 022-26556806

Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra ही एक महत्त्वाची समाज कल्याण विभागाची विशेष योजना आहे ज्याचा उद्देश महाराष्ट्रातील सामाजिक असुरक्षित आणि उपेक्षित घटकांना आर्थिक सहाय्यच्या माध्यमातून आधार प्रदान करणे आहे.

ही योजना निराधार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांची सामाजिक व आर्थिक स्थिती उंचावण्याचा सतत प्रयत्न करते, ज्यामुळे त्यांना समाजात मान उंचावून राहावी तसेच त्यांचा जीवनाची गुणवत्ता सुधारली जावी आणि स्वावलंबनाला चालना मिळावी.

विविध फायदे आणि विशिष्ठ तरतुदींसह, ही योजना महाराष्ट्रातील निराधार समुदायांना भेडसावणाऱ्या सामाजिक-आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्यात महत्त्वाची भूमिका बजावते आणि अधिक सामाजिक न्याय्य निर्मितीमध्ये विशेष योगदान देते.

संजय गांधी निराधार योजना काय आहे?

साधारणपणे राज्यातील निराधार व्यकती म्हणजे ज्या व्यक्ति स्वत:चा उदरनिर्वाह करु शकत नाहीत. उदा. अपंग, अनाथ, दुर्धर रोग ग्रस्त्, विधवा स्त्रिया, एच.आय.व्ही ग्रस्त, अत्याचारीत महीला, वेश्याव्यवसायातून मुक्त केलेल्या महीला, 35 वर्षावरील अविवाहीत महीला इ. लाभ देण्यात येतो

संजय गांधी निराधार योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

अपंगत्वाचे 40% आणि त्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेली व्यक्ती संजय गांधी निराधार पेन्शनसाठी पात्र आहे . गंभीर आजारानेबाधित झालेली व्यक्ती 65 वर्षांपेक्षा कमी वयाची असणे बंधनकारक आहे तरच पात्र ठरेल. आणि व्यक्तीचे कौटुंबिक उत्पन्न 21000 रु.पेक्षा कमी असल्यास., तर ही लोकं पेन्शनसाठी अर्ज करू शकतात.

अपंगांना किती पेन्शन मिळते?

अगोदर १८ वर्षे ते ७९ वयोगटातील दिव्यांगज व्यक्तींना दरमहा ३००/- दिले जात होते. व 80 वर्षार्हून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी पेन्शन रु. 500/- दरमहा प्रदान केले जात. नवीन gr नुसार अपडेटेड माहिती वाचून घ्यावी.

संजय गांधी निराधार योजना कधी सुरू झाली?

निराधार व्यक्तींना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ उद्देशाने संजय गांधी निराधार अनुदान योजना १९८० पासून राज्यात राबविण्यात येत आहे.

A Local SEO Expert and an Experienced blogger from Pune.