RTE Admission 2024 : प्रक्रियेला आजपासून नव्याने सुरवात

by Sandeep Patekar
RTE Admission 2024

1) यापूर्वी RTE Admission 2024-25 या वर्षाकरिता आरटीई २५% प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. परंतु मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रीया सध्या स्थगित करण्यात आलेली आहे.

2) RTE Admission 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

3) यापूर्वी ऑनलाईन पदधतीने केलेल्या अर्जाच्या RTE Admission 2024-25 या वर्षाच्या आरटीई २५% प्रवेश प्रक्रीयेसाठी विचार केला जाणार नाही याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी.

पालकां करीता महत्वपूर्ण सूचना (RTE Admission 2024-2025)

1) RTE Admission 2024-2025 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.

2) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गूगल चे लोकेशन पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.

3) आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्म तारीख लिहावी.

4) १ कि.मी, १ ते ३ कि.मी अंतरावरील शाळा निवडत असताना कमाल १० च शाळा निवडता येतील.

5) अर्ज भरत असताना आवश्यक टी सर्व कागदपत्रे पालकांनी तयार ठेवावीत. लॉटरी लागली आणि कागदपत्रे नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची कृपया नोंद घ्यावी.

6) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वीच डिलीट करावा आणि नव्याने पुन्हा दूसरा अर्ज करावा.

7) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते दोन्ही अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.

8) अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत सुरक्षित जपून ठेवावी.

9) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द केला जाईल.

10) अर्ज करताना जर पासवर्ड विसरल्यास तो Recover Password या बटणावर क्लिक करून रिसेट करावा.

11) RTE मधून २५ % प्रवेश RTE Admission 2024-25 या वर्षाकरिता पालकांनी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 31 मे 2024 पर्यंत राहील.

12) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्या पुढील प्रमाण ग्राह्य धरण्यात येईल.

13) RTE Admission 2024-25 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .

14) RTE Admission 2024-25 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास केवळ राष्ट्रीयकृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येईल.

15) अर्ज भरताना location चुकवू नये म्हणून google वर पत्ता टाकून ते lattitude आणि longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.

Notifications for RTE Admission 2024

 RTE २५% ऍडमिशन साठी पालकांकरीता सूचना: Click Here to download

Self Declaration / हमीपत्र

You may also like

Adblock Detected

Please support us by disabling your AdBlocker extension from your browsers for our website.