व्याजमुक्त 1 लाख रु. कर्ज शिष्यवृत्ती | Sakal Foundation Scholarship 2023

Sakal Foundation Scholarship 2023 : सकाळ फाउंडेशनचे हे ६४ वे वर्ष असून, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून 1 लाख रु.चेव्याजमुक्त कर्ज सकाळ फाउंडेशन मार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. त्याचप्रमाणे पीएच. डी. साठी परदेशात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या किंवा पी एच डी करत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या अशा 50 शिष्यवृत्ती दिल्या जातील.

जर पैशाची कमतरता ही एकमेव गोष्ट तुम्हाला थांबवत असेल तर शैक्षणिक कर्ज हे तुम्हाला त्या शैक्षणिक संधी मिळवण्यात मदत करू शकते. तुम्ही शैक्षणिक कर्ज घेता तेव्हा तुम्हाला विविध फायदे मिळतात. परंतु, तरीही हे विद्यार्थ्यावर दायित्व असू शकते आणि येथे त्या शैक्षणिक कर्जांचे महत्त्व वाढते, जे शून्य व्याजासह मिळते.

जेंव्हा की सहज आपण बँकेकडून कर्ज गेटले असतं ते आपल्या साहजिकच 12%-18% व्याजासह पडत असते. बऱ्याचदा बँकासुद्धा या मध्ये फसवणूक करु शकतात. म्हणून हा पर्याय मला खूप सोईस्कर वाटत आहे.

सकाळ फाउंडेशन कर्ज शिष्यवृत्तीचे मुख्य फायदे

Sakal Social Foundation Education मार्फत व्याजमुक्त शैक्षणिक कर्ज घेण्याचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत:

  • पारंपारिक शैक्षणिक कर्जाच्या तुलनेत कमी दायित्व.
  • आवश्यक घरगुती खर्चासाठी पालकांची बचत होऊ शकते.
  • तत्काळ आणि आणीबाणच्या परिस्थितीस सामना करण्यास याची मदत होते.
  • वेळेवर कर्जाची परतफेड केल्याने चांगला क्रेडिट स्कोर तयार होतो.
  • शैक्षणिक कर्जामुळे जबाबदारीची भावना निर्माण होते.

हे वाचलत का ? : सुकन्या समृद्धी योजना (SSY) ला आता मिळणार 8 टक्के व्याज | Sukanya Samriddhi Yojana

Sakal India Foundation Scholarship Education

Sakal India Foundation Scholarship Education या संस्थेच्या स्थापनेची कल्पना कमकुवत आर्थिक पार्श्वभूमीतील गुणवंत विद्यार्थ्यांना अनुदान आणि शिष्यवृत्तीसह उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे होती.

SIF ने जात, पंथ, लिंग आणि धर्म यांचा विचार न करता भारत आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी उत्कृष्ट गुणवत्ता असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना व्याजमुक्त कर्ज शिष्यवृत्ती दिलेली आहे.

पात्रता : Eligibility for Interest Free Loan Scholarship

कर्जासाठी संमती मिळविण्यासाठी उमेदवारांनी पात्रता पूर्ण करणे आवश्यक असलेली नियम व अटी खाली दिल्या आहेत :

पात्रता निकष Eligibility for Interest Free Loan Scholarship
राष्ट्रीयत्वभारतीय
शैक्षणिक पात्रतापदवी / पदव्युत्तर पदवी किंवा पीजी डिप्लोमा
उत्पन्नाचे स्रोतपालक
उत्पन्नस्थिर
कोणत्या विद्यापीठासाठीमान्यताप्राप्त विद्यापीठासाठी अर्ज – भारतात / परदेशात
प्रवेशाची स्थितीप्रवेशाची स्थिती निश्चित झालेली पाहिजे
सुरक्षा कशीहमीदार / ग्यारानटर

हे वाचलत का ? : महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना 2023 | MahaDBT Farmer Scheme list

आवश्यक कागदपत्रे | Sakal Foundation Scholarship

कर्जासाठी अर्ज करताना विद्यार्थ्याने SIF वेबसाइटवर अपलोड करन्यास आवश्यक असलेली अनिवार्य कागदपत्रे खाली दिली आहेत:

  • रीतसर ऑनलाइन भरलेला अर्ज.
  • 10वी / 12वीच्या परीक्षेच्या गुणपत्रिकांची प्रत आणि नवीनतम शैक्षणिक प्रमाणपत्र.
  • अभ्यासक्रमाचा खर्च/अभ्यासाचा खर्च विवरण.
  • विद्यार्थीचे व पालकाचे आधार कार्ड आणि तसेच पॅन कार्ड.
sakal social foundation education
sakal social foundation education

शिष्यवृत्तीचा कालावधी

व्याजमुक्त कर्ज शिष्यवृत्तीचा कालावधी 2 वर्षे आहे.

हे वाचलत का ? : Mahatma Phule Karj Mafi Yojana | महात्मा फुले कर्ज मुक्ती योजना 2023

Sakal Foundation च्या व्याजमुक्त कर्ज शिष्यवृत्तीसाठी कोणी अर्ज करावा?

परदेशी विद्यापीठ किंवा संशोधन संस्थेकडून किमान एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी (२०२३-२४) प्रवेशाचे लिखित पत्र. ज्या विद्यार्थ्यांना पीएच.डी.च्या प्रवेशासाठी 2021 ला किंवा त्यापूर्वी विद्यापीठ किंवा राष्ट्रीय संशोधन संस्थेकडून लेखी पत्र मिळाले आहे असे. भारतातील विद्यापीठे किंवा राष्ट्रीय संशोधन संस्था या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील. अर्ज करण्यास Sakal India Foundation या लिंक वर क्लिक करा

Sakal Foundation Scholarship 2023 साठी काय नियम असतील?

विद्यार्थ्यांनी 2 वर्षापूर्वी किंवा त्यापूर्वी शिष्यवृत्तीची परतफेड करणे आवश्यक आहे. वृत्तपत्र व्यवसायात पदव्युत्तर पदवी किंवा पीएच. डी. करणार्‍या विद्यार्थ्याला 1 लाख रु.ची रक्कम न भरण्याच्या अटीवर मान्यता दिली जाईल. Sakal Foundation Scholarship 2023 अर्जाची मुदत – 15 मे पासून चालू झालेली आहे.

Sakal Social Foundation Education अधिक माहितीसाठी संपर्क पत्ता :

सकाळ इंडिया फाउंडेशन

सकाळ मुख्य कार्यालय, 595, बुधवार पेठ, पुणे 41002

संपर्क क्रमांक :

Sakal Social Foundation Education Telephone : 020-66035935

ई-मेल – contactus@sakalindiafoundation.org/sakal

पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी केळकर शिष्यवृत्ती

सकाळ इंडिया फाऊंडेशनने कै. लक्ष्मण विष्णू केळकर आणि कै. उषा लक्ष्मण केळकर यांच्या सुवर्ण महोस्तव वर्षास त्यांच्या नवे पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी केळकर शिष्यवृत्ती सुरू केलेली आहे. ही योजना केवळ महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठीच केळकर शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे.

सकाळ फाऊंडेशन शिष्यवृत्तीसाठी पोलिस कर्मचाऱ्याच्या पाल्यासाठी काही विशेष जागा राखीव सुद्धा आहेत आणि, ज्या विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमधून प्रवेशपत्र मिळाले आहेत. अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांनी मात्र Sakal Foundation Scholarship च्या केळकर शिष्यवृत्तीसाठी योजने साठी अर्ज करावेत, असे आवाहन सकाळ इंडिया फाउंडेशनने केले आहे.

दोन शब्द

मित्रांनो, या लेखात आम्ही सकाळच्या माध्यमातून सकाळ फाऊंडेशन शिष्यवृत्ती योजनेची एक लाख रुपये व्याजमुक्त शिष्यवृत्ती योजना जसे की, उद्देश, योजना काय आहे, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, अर्ज कसा करावा इत्यादी माहिती दिली आहे. आणि ही पोस्ट तुम्हाला आवडली की तुम्ही ही पोस्ट इतर गरजू मित्रासोबत शेअर करायला विसरू नका.

A Local SEO Expert and an Experienced blogger from Pune.