Abdul Kalam Yojana for 10th Pass Students विद्यार्थ्यांना मिळणार 25000 रु. सहाय्य

by Sandeep Patekar
Abdul Kalam Yojana for 10th Pass Students

पुणे महानगरपालिकेद्वारे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद योजना (Abdul Kalam Yojana for 10th Pass Students) आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजना (Lokshahir Annabhau Sathe Yojana for 12th Pass) या केवळ पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या रहिवाशांसाठी लागू आहेत.

पुणे महानगर पालिकाद्वारे दरवर्षी भारतरत्न डॉ. अबुल कलाम आझाद योजना आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजने अंतर्गत 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करते.

यावर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज दि. ०९ ऑक्टोबर २०२३ ते २९ डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी सायं. ०५.३० वा. संकेतस्थळावर अर्ज भरणेची सुविधा बंद करण्यात येईल.

विद्यार्थ्यांनी dbt.pmc.gov.in वर ऑनलाइन अर्ज भरावा आणि भरलेल्या अर्जाची प्रिंट-आउट सबमिट करावी.

आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रत स्कॅन करून सोबत अपलोड करावीत.

काय आहे योजना: Abdul Kalam Yojana for 10th Pass Students

या वर्षी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) किंवा कोणत्याही समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पुण्यातील कोणत्याही विद्यार्थ्याला भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद (Abdul Kalam Yojana for 10th Pass Students) शैक्षणिक योजनेअंतर्गत 15,000 रु.ची एक वेळची शिष्यवृत्ती मिळेल.

Abdul Kalam Yojana for 10th Pass Students
Lokshahir Annabhau Sathe Yojana for 12th Pass

तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Lokshahir Annabhau Sathe Yojana for 12th Pass) शैक्षणिक योजनेतून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) किंवा कोणत्याही समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकाला 25,000 रु. ची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

Abdul Kalam Scholarship Yojana योजनांसाठी कोण अर्ज करू शकतो?

  • Abdul Kalam Scholarship Yojana योजनांसाठी विद्यार्थी हा पुणे महानगरपालिका अंतर्गत क्षेत्रातीलच असावा.
  • विद्यार्थ्याने चालू वर्षात SSC किंवा HSC परीक्षेत किमान 80% गुण मिळवलेले असावेत.
  • विद्यार्थी मागास प्रवर्गातील असल्यास किंवा पुणे महानगरपालिकेच्या नियमित/रात्रीच्या शाळेत शिकत असल्यास, त्याने/तिने किमान 70% प्राप्त करणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थी 40% अपंग असल्यास, किमान टक्केवारी 65% असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्याने पुढील उच्च शिक्षणासाठी सरकारी मान्यताप्राप्त संस्थेत (कॉलेजात) अर्ज केलेला असावा.

Abdul Kalam Scholarship Yojana योजनेचे अर्ज करण्यास शेवटची तारीख २९/१२/२०२३ या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर भरणेत यावेत.

Lokshahir Annabhau Sathe Yojana for 12th Pass अर्ज भरणेकरीता सूचना

१) लाभार्थ्याने यापूर्वी संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन केले असल्यास त्याच user id व password ने अर्ज भरावा. नवीन लाभाथ्र्यांनी नागरिक login द्वारे नविन रजिस्ट्रेशन करून user id व password च्या आधारे अर्ज भरावा.

२) मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांनी मागासवर्गीय कल्याणकारी योजना व खुल्या प्रवर्गातील लाभाथ्र्यांनी युवक कल्याणकारी योजने अंतर्गत अर्ज भरणे आवश्यक आहे.

३) अर्ज पालकांच्या नावे भरणे आहे.

४) संकेतस्थळावर नमूद केलेल्या अटी व शर्ती नुसार मूळ (Original) कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. साक्षांकित झेरॉक्स प्रती अपलोड केल्यास अर्ज बाद करणेत येईल.

५) dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेबाबतचा नमुना (हमीपत्र) उपलब्ध करून देणेत आला आहे. त्यानुसार माहिती पालक व महाविद्यालयांनी भरल्यानंतरच सदरचे हमीपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.

६) लाभार्थी CBSE/ICSE शाळेतून उत्तीर्ण झाले असल्यास शाळा / महाविद्यालयाकडून टक्केवारी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहिल.

७) शैक्षणिक अर्थसहाय्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असणे आवश्यक आहे.

८) अटी व नियमांप्रमाणे भरलेल्या अर्जाचा विचार केला जाईल तसेच नाकारणेत आलेल्या अर्जाबाबत अर्जदाराने दिलेल्या मुदतीमध्ये आक्षेप पुर्तता केल्यास सदर अर्जावर पुढील कार्यवाही केली जाईल. मुदतीमध्ये तृटीची पुर्तता न केल्यास अर्ज पूर्णतः रद्द करण्यात येईल.

९) अर्ज भरताना अर्जदाराने अर्ज हा save as draft मध्ये तसाच ठेवल्यास व सदरचा अर्ज सादर (Submit) न केल्यास अशा अर्जांचा विचार केला जाणार नाही. या बाबतची सर्वस्वी जबाबदारी अर्जदारांची राहिल. तसेच याबाबत अधिक माहिती हवी असल्यास पुणे महानगरपालिकेच्या संबंधित क्षेत्रिय कार्यालयामध्ये असलेल्या समाज विकास विभागाकडील कर्मचाऱ्यांकडे संपर्क साधावा.

(१०) अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर अर्जाबाबतची सद्यस्थिती लॉगिनद्वारे जाणून घेण्याची जबाबदारी नागरिकांची राहील.

Abdul Kalam Shishyavrutti Yojana च्या सविस्तर नियम व अटी

Lokshahir Annabhau Sathe Yojana for 12th Pass अटी-नियम

Abdul Kalam Yojana Scholarship योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

सदर Abdul Kalam Shishyavrutti Yojana बाबतचा संपुर्ण तपशील तसेच अटी व शर्ती पुणे महानगरपालिकेच्या dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. १८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा

FAQs on Abdul Kalam Shishyavrutti Yojana

अब्दुल कलाम शिष्यवृत्तीसाठी कोण पात्र आहे?

या वर्षी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) किंवा कोणत्याही समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पुण्यातील कोणत्याही विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती मिळू शकते.

एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती म्हणजे काय?

निवडलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी/अनुदानित पुढील इयत्तेचा अभ्यासक्रम करण्यासाठी ₹ 15,000 ची शिष्यवृत्ती मिळते.

अब्दुल कलाम शिष्यवृत्ती फॉर्म कसा भरायचा?

https://dbt.pmc.gov.in/ या वेबसाइट वरुण Abdul Kalam Scholarship Yojana साठी अर्ज कर्ता येतो.

एपीजे अब्दुल कलाम स्कॉलरशिप ची शेवटची तारीख काय आहे?

Abdul Kalam Scholarship Yojana योजनेचा अर्ज करण्यास शेवटची तारीख २९/१२/२०२३ या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने https://dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर भरण्यात यावेत.

You may also like

Adblock Detected

Please support us by disabling your AdBlocker extension from your browsers for our website.