MUCBF Recruitment 2023 महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँकेत ‘लिपिक’ १९ पदासाठी भरती

by Sandeep Patekar
MUCBF Recruitment 2023

MUCBF Recruitment 2023: नाशिक जिल्ह्यातील ९०० कोटी रुपयांचेवर व्यवसाय असणाऱ्या एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत ‘लिपिक’ या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि., मुंबई (MUCBF) यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

MUCBF Recruitment 2023 सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेद्वारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि. २३/१०/२०२३ रोजी सकाळी ११.०० पासून ते ०१/११/२०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत भरून पाठवावेत.

The Maharashtra Urban Cooperative Banks Federation Ltd. MUCBF Recruitment 2023

लिपिक पदाचा तपशील आणि महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत:

विभागाचे नाव: Maharashtra Urban Cooperative Bank

पदाचे नाव: लिपिक

एकूण पदे: १९ पदे लिपिक

नोकरीचे ठिकाण: नाशिक जिल्हा

शैक्षणिक अर्हता :

  • शासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक.
  • दि. ३०.०९.२०२३ रोजी शैक्षणिक अर्हतापूर्ण करत असलेले उमेद्वाराचे अर्ज पात्र असतील.
  • जर परीक्षेचा निकाल फक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर अपडेट केला गेला असेल किंवा वेबसाइटवर आधारित प्रमाणपत्र देऊ केले गेले असेल, तर उमेद्वाराने त्यासंदर्भात मूळ प्रमाणपत्र Original Degree Certificate बँकेला सादर करणे आवश्यक राहील आणि त्यावर विद्यापीठाच्या अधिकृत अधिकाऱ्याची परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची तारीखेसह स्वाक्षरी व शिक्का असणे आवश्यक राहील.

वयोमर्यादा: दि. ३०.०९.२०२३ रोजी किमान २२ ते कमाल ३५ वर्षे

प्राधान्य:

१. वाणिज्य शाखेतील (बी. कॉम) पदवी आणि (एम. कॉम) पदव्युत्तरांना लिपिक पदाकरीता प्राधान्य देण्यात येईल.

२. कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.

भाषेचे ज्ञान: मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे. मराठी भाषेचे ज्ञान असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.

परीक्षेचे स्थळ: नाशिक

अर्जाची पद्धत: ऑनलाईन

निवड कार्यपद्धती :

१. ऑफलाईन परीक्षा :

लिपिक पदाकरिता १०० गुणांची बहुपर्यायी प्रश्नाची ऑफलाईन पद्धतीने इंग्रजी माध्यमातून परीक्षा घेण्यात येईल. बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांमध्ये गणित, इंग्रजी व्याकरण, संगणक आणि सहकार ज्ञान, बौधिक चाचणी, बँकिंग आणि सामान्य ज्ञान या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असेल. त्यानंतर १०० पैकी प्राप्त गुणांचे ९०च्या गुणोत्तर प्रमाणामध्ये रुपांतर करण्यात येईल.

२. कागदपत्रके पडताळणी:

उमेदवारास ऑफलाईन (Offline) परीक्षेतील गुणांच्या उतरत्या क्रमवारीनुसार बँकेच्या धोरणाप्रमाणे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक मूळ प्रमाणपत्रकांची प्राथमिक पडताळणीसाठी बोलविण्यात येईल. त्यावेळी उमेद्वाराने मूळ कागदपत्रके उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र असणाऱ्या उमेदवारास बँकेच्या धोरणाप्रमाणे संस्थेकडून मुलाखतीस बोलविण्यात येईल.

३. मुलाखत:

लिपिक पदाकरिता उत्तीर्ण होणाऱ्या उमेद्वारांना बँकेच्या धोरणानुसार भरावयाचे पदसंख्येच्या प्रमाणात ऑफलाईन परीक्षेचे गुणानुक्रमे मौखिक मुलाखतीस बोलविण्यात येईल. मुलाखतीकरिता संपूर्ण १० गुण (शैक्षणिक पात्रते करिता ५ गुण व मुलाखतीकरिता ५ गुण) राहतील. मुलाखतीस गैरहजर राहिल्यास संबंधित उमेदवार अंतिम निवडीस (परीक्षेत उत्तीर्ण झालेला असला तरी) पात्र राहणार नाही.

४. उमेद्वाराची अंतिम निवड सूची:

उमेद्वाराचे ऑफलाईन (Offline) परीक्षेतील गुण अधिक मौखिक मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण १०० गुणांपैकी गुणानुक्रमे अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल.

परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे स्वीकारले जाईल :

परीक्षा शुल्क रु.८००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु. ९४४/- (विना परतावा)

MUCBF Recruitment 2023 बँक खात्याचा तपशील:

बचत खाते क्र.: 09780210001950, IFSC code: UCBA0000978

खतेदाराचे नाव: The Maharashtra Urban Cooperative Banks Federation Ltd.

बँकेचे नाव: UCO Bank, Wadala Branch, Mumbai-400031.

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख: २३.१०.२०२३ (सकाळी ११ पासून)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१.११.२०२३ ( रात्री ११.५९ वाजेपर्यंत)

Maharashtra Urban Cooperative Bank Official website
http://www.mucbf.in/

आत्ताच अर्ज करा

You may also like

Adblock Detected

Please support us by disabling your AdBlocker extension from your browsers for our website.