Konkan Railway Recruitment 2023 रेल्वेत नोकरीचे स्वप्न होणार साकार! कोकण रेल्वेत अप्रेंटिस अर्ज सुरु

by Sandeep Patekar
Konkan Railway Recruitment 2023

Konkan Railway Recruitment 2023 : कोकण रेल्वे अंतर्गत तब्बल १९० जागांवर अप्रेंटीसशीप साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इंजिनिअरिंग डिग्री आणि डिप्लोमा धारकांसाठी ही मोठी संधी असणार आहे.

Konkan Railway Recruitment 2023

सरकारी नोकरी च्या शोधत असणार्‍या आणि रेल्वेमध्ये नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे अंतर्गत पदवीधर शिकाऊ / तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ पदांच्या एकूण १९० रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.

कोकण रेल्वेत अप्रेंटिस या भरती होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२३ असून उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे.

विभागाचे नाव : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Recruitment)

पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटिस (Graduate apprentice), जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन (Diploma apprentice) अप्रेंटिस

पदवीधर अप्रेंटिस: ८० जागा

टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस : ३० जागा

जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस : ८० जागा

एकूण पदसंख्या : 190

शैक्षणिक पात्रता :

पदवीधर अप्रेंटिस (Graduate apprentice) : संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी

जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस : B.Com/B.Sc/BMS/B.A/BBA /व्यवसाय अभ्यास/पत्रकारिता आणि जनसंवाद पदवी

टेक्निशियन अप्रेंटिस (Diploma apprentice) : संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा

वयोमर्यादा :

 • खुला प्रवर्ग : 18 ते 25 वर्षे
 • ओबीसी : 3 वर्षे सूट
 • मागासवर्गीय : 5 वर्षे सूट

अर्ज शुल्क :

 • खुला/ ओबीसी प्रवर्ग : 100 रुपये
 • मागासवर्गीय/ महिला/ EWS : फी नाही

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक

अर्ज भरण्यासाठी सुरुवातीची तारीख : 15 नोव्हेंबर 2023

अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख : 10 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : अधिक माहितीसाठी https://konkanrailway.com/ या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज : Konkan Railway Recruitment 2023 Apply Online

कोकण रेल्वे शिकाऊ भरती 2023 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी चरणांचे अनुसरण करावे

 1. उमेदवारांनी प्रथम nats.education.gov.in द्वारे नोंदणी करावी आणि एक अद्वितीय नावनोंदणी क्रमांक तयार केला जाईल.
 2. उमेदवाराने KRCL च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या लिंकद्वारेच अर्ज भरावा: https://konkanrailway.com/
 3. Apply for Trainee Apprentices (Konkan Railway Recruitment 2023 Apply Online)” या लिंकवर क्लिक करा.
 4. ऑनलाइन अर्ज करा लिंकवर क्लिक करा आणि सर्व आवश्यक तपशीलांसह अर्ज भरा.
 5. कोकण रेल्वे भरती (Konkan Railway Recruitment 2023 Apply Online) करण्यासाठी अर्ज शुल्क भरा.
 6. अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी सबमिट केलेल्या कोकण रेल्वे अर्जाची प्रिंटआउट घ्या.

कोकण रेल्वे शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड सर्व वर्षे/सेमिस्टरसाठी मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे केली जाते. एकूण टक्केवारी मिळविण्यासाठी एकूण गुणांची बेरीज केली जाईल आणि त्यानुसार गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

You may also like

Adblock Detected

Please support us by disabling your AdBlocker extension from your browsers for our website.