शेतकऱ्यांनो P M Kisan Samman Nidhi Yojana आणि Namo Shetkari Yojana चे एकत्रित 12000 रुपये हवे आहेत ना?

by Sandeep Patekar
P M Kisan Samman Nidhi Yojana Namo Shetkari Yojana

शेतकऱ्यांनो, केंद्र सरकारच्या पीएम किसान ( P M Kisan Samman Nidhi ) योजनेच्या वार्षिक 6,000 रु. आणि राज्य सरकारच्या नवीन आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी ( Namo Shetkari Yojana )योजनाच्या वार्षिक 6,000 रु. असे मिळून संपूर्ण 12,000 रुपये हवे आहेत ना? मग लवकर पूर्ण करा ई-केवायसी ची प्रक्रिया..!

सर्वच जिल्ह्यातील पीएम- किसान योजनेच्या सर्व पात्र लाभाच्यांना आवाहन करण्यात येत आहे कि, ई-केवायसी, आधार बँक खात्याशी जोडलेले आहेत (आधार बँक लिंक ) आणि सीडिंग (Land seeding) केले आहे याची खात्री केली पाहिजे.

P M Kisan Samman Nidhi Yojana

पी. एम. किसान योजनेचा मे, 2023 महिन्या मध्ये वितरीत केल्या जाणा-या 14 व्या हप्त्याच्या ( pm kisan 14 installment date 2023 ) लाभासाठी केंद्र सरकारने खालील तीन बाबी बंधनकारक केलेल्या आहेत.

● लाभार्थ्याला p m kisan samman nidhi ई-केवायसी सोबतच बँक खात्याला आधार संलग्न करणे तसेच राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे अद्ययावत करणे ( Namo Shetkari Yojana Land seeding ) या तिन्ही बाबी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

अन्यथा केंद्र शासनाच्या ‘पीएम किसान योजना‘ तसेच राज्य शासनाच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना‘ ( namo shetkari yojana ) या दोन्ही योजनेच्या एकत्रित वार्षिक रु १२०००/- लाभापासून लाभार्थी वंचित राहू शकतो.

हे वाचलत का ? : व्याजमुक्त 1 लाख रु. कर्ज शिष्यवृत्ती | Sakal Foundation Scholarship 2023

Namo Shetkari Sanman Yojana

● E-kye पर्यायासमोर NO असल्यास लाभार्थ्याना ई-केवायसी करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘PMKISAN Gol‘ App द्वारे सेल्फी फोटो काढून ई-केवायसी करणे सुद्धा सुलभ झालेले आहे.

land seeding pm kisan
land seeding pm kisan

पी. एम. किसान पोर्टलवरील Farmers. Corner मधील eKYC OTP आधारीत सुविधेद्वारे e-KYC प्रमाणिकरण करून घ्यावे. किंवा सामाईक सुविधा केंद्र (CSC) वर जाऊन e-kyc करून घ्यावी

हे वाचलत का ? : महा डीबीटी पोर्टल सर्व शेतकरी योजना

● Land seeding पर्यायासमोर NO असल्यास, namo shetkari sanman yojana चा लाभ मिळवण्यासाठी तलाठी किंवा तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधून Land seeding करून घ्यावी.

● संबंधित लाभार्थीने बँक खात्याला आधार संलग्न केलेले नसल्यास बँकेत जाऊन बैंक खात्याशी आधार संलग्न ( adhaar Seeding )करून घ्यावे किंवा पोस्ट मास्तर यांच्या मार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (IPPB) खाते उघडणे.

संबंधित लाभार्थीने पी.एम. किसान ( p m kisan samman nidhi ) पोर्टलवर BENEFICIARY STATUS ऑप्शन मधून आपली माहिती तपासून वरील तिन्ही बाबींची पूर्तता झाली आहे की नाही याची खात्री करावी.

Namo Shetkari Samman Nidhi Yojana यासाठी पी.एम. किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित न राहण्यासाठी वरील बाबींची तात्काळ पूर्तता करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी अधिकारी यांच्याकडून करण्यात येत आहे.

You may also like

Adblock Detected

Please support us by disabling your AdBlocker extension from your browsers for our website.